google-site-verification=R_wkYld8AcZSm8zbbHF3r_9HPVLmsOapfLKX6vX3T9k smarts teacher.blogspot.in: मूल्यवर्धन

Pages

माझ्या ब्लॉगवर मी श्री.विनोद पवार स्वागत करत आहे,ब्लॉगवरील माहिती अपडेट करणे चालू आहे.

मूल्यवर्धन

मूल्यवर्धन विद्यार्थी व शिक्षकां करिता उपक्रम पुस्तिका आणि अँप

मूल्यवर्धन
ज़िल्हा परिषद शाळांमधील विद्यार्थ्यांमध्ये भारतीय राज्य घटनेतील मूल्ये रुजविण्यासाठी महाराष्ट्र शासन व शांतिलाल मुथ्था फाऊंडेशनने मूल्यवर्धन कार्यक्रम सुरू केला आहे. 

या उपक्रमाची यशस्वी अंमलबजावणी करण्यासाठी आपणास काही मार्गदर्शक पुस्तिका तसेच काही महत्वाचे प्रपत्र आवश्यक आहेत 

ते mhschoolteacher अर्थातच महाराष्ट्र स्कूल टीचर या ब्लॉग वर शिक्षक मित्रांकरिता उपलब्ध करून देत आहे

वेळोवेळी महत्वाचे मूल्यवर्धन कार्यक्रमा सम्बंधित माहिती , उपयुक्त साहित्य या ब्लॉग वर उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करत राहील.



(थोडक्यात मूल्यवर्धन कार्यक्रमाची माहिती)

मूल्यवर्धन
ज़िल्हा परिषद शाळांमधील विद्यार्थ्यांमध्ये भारतीय राज्य घटनेतील मूल्ये रुजविण्यासाठी महाराष्ट्र शासन व शांतिलाल मुथ्था फाऊंडेशनने मूल्यवर्धन कार्यक्रम सुरू केला आहे. 
या वर्षी (शैक्षणिक वर्ष २०१७-१८) महाराष्ट्रातील १०७ तालुक्यात १० लाख विद्यार्थ्यांपर्यंत या कार्यक्रमाची अंमलबजावणी सुरु आहे. या सर्व १०७ तालुक्यांमधून प्रत्येक केंद्रातील दोन शिक्षक व एक केंद्र प्रमुख यांनी पहिले चार दिवसांचे तालुका पातळीवरचे मूल्यवर्धन प्रशिक्षण जून ते सप्टेंबर मध्ये महाराष्ट्र शासनातर्फे घेतले आहे. शांतीलाल मुथ्था फाऊंडेशन शासनाला ह्यासाठी सहकार्य करत आहे. प्रशिक्षित शिक्षकांना आपण मूल्यवर्धन प्रेरक असे म्हणतो. यापुढे हेच मूल्यवर्धन प्रेरक केंद्र पातळीवर इतर शिक्षकांना प्रशिक्षण देणार आहेत. ही अतिशय मोलाची जबाबदारी ह्या सर्व जिल्हा परिषदेच्या शिक्षकांनी स्वतःहून स्वीकारली आहे. या सर्वांचा उत्साह अतिशय चांगला आहे. साधारण ५००० प्रेरक तयार झाले व दिवाळी पूर्वी २ महिने त्यांनी त्यांच्या शाळेत विद्यार्थ्यांसोबत मूल्यवर्धन उपक्रमांची अंमलबजावणी केली आहे सध्या नोव्हेंबर महिन्यामध्ये प्रेरकांचे २ दिवसांचे प्रशिक्षण जोरदार उत्साहाने चालू आहे. येत्या २ महिन्यात या सर्व प्रेरकांचे प्रशिक्षण पूर्ण होईल आणि नंतर ते त्यांच्या केंद्रामधील सर्व शिक्षकांना ४ दिवसांचे मूल्यवर्धन प्रशिक्षण देतील जेणेकरून ते शिक्षक आपापल्या शाळांमधील विद्यार्थ्यांपर्यंत ते पोहचवतील. सध्या काही ठिकाणी प्रेरक त्यांच्या केंद्रातील शिक्षकांना केंद्रपातळीवरचे प्रशिक्षण देत आहेत.

या फौंडेशनची अधिकृत वेब साईट आहे
कार्यक्रमच्या अधिक माहितीसाठी भेट द्या



सौजन्य:_

मूल्यवर्धन कार्यक्रम
SMF


खालील तक्त्यातील साहित्य डाउनलोड या बटनावर क्लीक करून डाउनलोड करता येईल.




इयत्ताविद्यार्थी उपक्रम पुस्तिकाशिक्षक उपक्रम पुस्तिका
1लीDownloadDownload
2 रीDownloadDownload
3 रीDownloadDownload
4 थीDownloadDownload
वर्गउपक्रम आयोजन पुस्तिका (शिक्षक)DownloadDownload
मूल्यवर्धन अँपDownloadDownload
इतर महत्वाचेDownloadDownload

No comments:

Post a Comment