निकालाबाबत...
महोदय, वरील विषयान्वये आपणास सुचीत करण्यात येते की, इ.५वी ते इ९वी च्या निकालासंर्दभात पुढीलप्रमाणे पुर्वतयारी करावी.
१)शासन निर्णयानुसार इ१ली ते इ ८वी संकलीत मुल्यमापन परीक्षा रद्द केल्याने RTE नुसार सर्व विद्यार्थी पुढील इयत्तेसाठी पात्र ठरलेले आहेत. मात्र द्वितीय सत्राच्या घटक चाचणी परीक्षा व आकारिक मुल्यमापनाचे गुणपत्रक (अ)पूर्ण करावे . संकलित गुणपत्रक(ब)च्या संदर्भात आकारिकला जर 5वी व 6वी 50 पैकी 45 मार्क असतील तर सूत्रानुसार 45×100÷50= 90 तसेच 7वी व 8वी साठी 40 पैकी 35 मार्क असतील तर सूत्रानुसार 35×100÷40=87 या नुसारही श्रेणी काढून नोंद करता येईल .. प्रगतीपुस्तकात आवश्यक सुधारणा व आवड/छंद याची नोंद करावी.
२) ग्रामीण भागात इ.९वी ची सर्व विषयांची द्वितीय सत्र परीक्षा झालेली असल्याने दि.५मार्चच्या संस्थेच्या परीपत्रकानुसार निकालाचे कामकाज पुर्ण करावे.शहरी भागातील शाळांनी विज्ञान-१/ इतिहास/ हिंदी संयुक्त या विषयांना मिळालेले गुण विज्ञान-२/भूगोल/संस्कृत संयुक्त या विषयांना देऊन घ्यावे व निकालाचे कामकाज पुर्ण करावे. मात्र इ.९वी तील नापास होणाऱ्या विद्यार्थी संदर्भात लेखी शासन आदेश प्राप्त होताच आपणास स्वतंत्र परिपत्रकाद्वारे सुचीत केले जाईन.
३) दि.१७ मे २०२० पर्यंत लाँकडाऊन असल्याने निकाल जाहीर करणे व शाळा प्रवेशासंर्दभात शासन आदेशानुसार कार्यवाही करण्याबाबत योग्य निर्देश आपणास दिले जातील.
वरीलप्रमाणे इ. ५ वी ते इ ९वीच्या निकालासंर्दभात कामकाज पुर्ण करुन घ्यावे. शासनाकडून मार्गदर्शन प्राप्त होताच आपणास निकालाबाबत योग्य त्या सुचना कळविण्यात येतील याची नोंद घ्यावी.
No comments:
Post a Comment